Amalner

Amalner: “प्रताप” च्या विद्यार्थ्यांची नेत्रदीपक भरारी..

Amalner: “प्रताप” च्या विद्यार्थ्यांची नेत्रदीपक भरारी..

अमळनेर येथील प्रताप कॉलेज मधील करिअर कौंसेलिंग सेंटरच्या 4 विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून झालेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व सिमा सुरक्षा दलात निवड झाली आहे.

यात चंद्रभान मधुकर पाटील (सीआयएसएफ), दिपक जंगलू पारधी (सीआयएसएफ),पाटील मयूर शेखर(बीएसएफ), पाटील तेजस तुळशीदास (बीएसएफ) यांची निवड झाली आहे.

सर्व विद्यार्थी कला व विज्ञान शाखेतील पदवीधर आहेत.निवड झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा फेब्रुवारी 2023 मध्ये झाली होती आणि निवड-मेरीट यादी 14 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झालीआहे.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री रोजगार मेळाव्यात 23 डिसेंबर 2024 रोजी नियुक्ती पत्र दिले जाणार आहेत. या प्रसंगी प्रधानमंत्री स्वतः उपस्थित राहतात.

त्यांच्या या यशाबद्दल खा.शि.मंडळाचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ.अरुण जैन, डॉ.जयंत पटवर्धन, खा.शी. मंडळाचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव यांनी विद्यार्थ्यांचे सत्कार व कौतुक केले..या प्रसंगी कुलसचिव राकेश निळे, अंतर्गत अभिवचन कक्षचे प्रमुख डॉ.मुकेश भोळे,करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, डॉ.धनंजय चौधरी, उपप्राचार्य डॉ.अमित पाटील, ग्रंथपाल दिपक पाटील, डॉ. माधव भुसनर,डॉ.जितेंद्र पाटील, डॉ.बालाजी कांबळे, डॉ.हर्ष नेतकर, सीसीएमसी विभागाचे दिलीप शिरसाठ, पराग पाटील,हिमांशू गोसावी, विशाल अहिरे इ उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सामजिक शैक्षिणक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button