Amalner: धूम स्टाईल चोर पुन्हा सक्रिय… चोऱ्यांचे वाढते सत्र…कोणाचाही धाक उरला नाही…
अमळनेर धूम स्टाईलने चोरी करण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले असून तालुक्यात चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे.दिवसा ढवळ्या देखील चोऱ्या होवू लागल्या आहेत.यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरात धूम स्टाईलने चोऱ्या होवू लागल्या आहेत.
दि 17 डिसें रोजी दुचाकीस्वारांनी धूम स्टाईल येत रस्त्याने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातून दोन तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावून पोबारा केल्याची घटना सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास बाजार समितीच्या भिंतीच्या मागे भालेराव नगर मध्ये घडली आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, रत्ना किशोर देसले वय 45, रा. प्लॉट न. 27 गुरुकृपा कॉलनी या सायंकाळी बाजार समितीच्या भिंतीमागील रस्त्याने जात असताना अचानक दोन मजबूत बांध्याचे विशीतील तरुण काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर येऊन रत्ना देसले यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावून नेली. अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.






