Amalner: राधाकृष्ण नगर येथील रस्त्याचे काम निकृष्ट…कामात दिरंगाई…नागरिकांचे हाल.. नागरिकांनी केली लेखी तक्रार…दखल न घेतल्यास न.प. वर मोर्चा…
अमळनेर येथील राधाकृष्ण नगर येथे रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम गेल्या 3/4 महिन्यांपासून सुरू आहे.सदर काम अत्यंत संथ गतीने सुरू असून निकृष्ट दर्जाचे असल्याची लेखी तक्रार परिसरातील नागरिकांनी अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना केली आहे.
सामुहिक उपरोक्त विषयान्वये सविनय अर्ज सादर करण्यात येतो की, सर्व्हे नं. १५२१ राधाकृष्ण नगर मध्ये रस्ता काँक्रीटीकरणाचे काम तीन महिन्या- पासून चालू आहे. अद्यापपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण कर पुर्ण झालेच नाही, कामात पूर्णतः डिले झाले असून अद्या- पपर्यंत पी.सी. सी. झालेले आहे. पी. सी. सी ला दिवस पूर्ण झाले असून अतिशय निकृष्ठ दर्जाचे झालेले आहे. पी. सी. सी पुर्ण सेट झालेले नाही. त्यात सिमेंट कालबाहय झालेले वापरले असून पी. सी. सी. ला पायाने धाकड़ा मारले असता उखडून चुरा होतो. कोणत्याही प्रकारची सिमेंटची पकड त्यात दिसून येत नाही. वाळूचा अजिबात वापर नाही.
तरी सदरील कामाची आपल्या प्रशासना कडुन प्रत्यक्ष पाहणी करून दर्जा पडताळणी करावी. दखल न घेतल्यास सदरील कामांच्या अन्याया निरुद्ध राधाकृष्ण वासीय नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल आणि आपले लक्ष वेधण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.
तरी माहितीस्तव व पुढील कार्यवाही साठी सविनय सामुहिक अर्ज सादर करण्यात आला आहे. अर्जावर परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत.






