आनंद मेळावा संपन्न
नंदूरबार शेख फहीम मोहम्मद
नंदुरबार:_शहरातील महाराष्ट्र विविध विधायक कार्य समिती संचालित *नॅशनल गर्ल्स हाईस्कूल व कनिष्ठ विद्यालय* येथे इ.५वी ते १० वी पर्यंत विद्यार्थिनींचा बाळ मेळावा घेण्यात आला. विद्यार्थिनींना ‘ *कमवा व शिका* ‘ याची जाणीव होण्यासह विविध वयवसाय व व्यवहाराची माहिती व्हावी यासाठी बाल मेळावा घेण्यात आला.
आनंद मेळाव्यात विद्यार्थिनींनी विविध खाद्यपदार्थ व वस्तूचे स्टॉल लावले होते. यात पाणीपुरी,गुलाब जामुन
ॲपे, वडापाव,इडली,मसाला पापड,पॅटीस,शेवपुरी,समोसा आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शेख अल्ताफ सर संचालक शेख मोहसिन सर, परवेक्षक कुरैशी अब्दुल रहीम सर विद्यार्थीनी,सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्यां यशस्वितेसाठी कला शिक्षिका हिना मॅडम, क़ाज़ी निकहत मॅडम, खाटीक निलुफर मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.






