Bollywood Stories: कैदी क्रं 7697…अल्लू अर्जुनची तुरुंगातील रात्र… जमिनीवर झोपून….?
४ डिसेंबरला हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’च्या प्रिमियर शोदरम्यान चेंगराचेंगरी झाली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी अटक झाली. एक रात्र तुरुंगात घालवल्यानंतर अभिनेता अल्लू अर्जुन शनिवारी सकाळी तुरुंगातून बाहेर पडला.
अल्लू अर्जुनला नामपल्ली कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आलं होतं. इंडिया टुडेने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनचा कैदी क्रमांक 7697 होता. तो रात्रभर चंचलगुडा तुरुंगातील बॅरेकमध्ये फरशीवर झोपला होता. त्याने रात्रभर काहीही खाल्लं नव्हतं. शुक्रवारी या प्रकरणात अंतरिम जामीन मिळाल्यानंतर अल्लू अर्जुन शनिवारी सकाळी कारागृहाच्या मागच्या गेटने बाहेर पडला.
अभिनेत्याला शुक्रवारी त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याला नामपल्ली न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर अभिनेत्याने तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली. तेलंगणा हायकोर्टाने त्याला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला.
अल्लू अर्जुनला शुक्रवारी जामीन मिळूनही तुरुंग प्रशासनाने सोडलं नाही, यावरून त्याच्या वकिलांनी टीका केली. “त्यांना हायकोर्टाकडून आदेशाची प्रत मिळाली पण तरीही त्यांनी अल्लू अर्जुनला सोडलं नाही. त्यांना याचं उत्तर द्यावे लागेल. हे बेकायदेशीर होतं, आम्ही कायदेशीर कारवाई करू,” असं अभिनेत्याचे वकील अशोक रेड्डी म्हणाले.
शुक्रवारी उशिरापर्यंत तुरुंग अधिकाऱ्यांना जामिनाची प्रत मिळाली नव्हती, त्यामुळे हायकोर्टाने जामीन देऊनही अभिनेत्याला रात्र तुरुंगात काढावी लागली, अशी माहिती तुरुंगातील सूत्रांनी पीटीआयला दिली. तसेच अंतरिम जामीन आदेशात त्रुटी होती, त्यानंतर एक नवीन आदेश जारी करण्यात आला, जो शुक्रवारी रात्री उशिरा कारागृहात पोहोचला. आला. जामिनाच्या प्रतीची तपासणी करणं आवश्यक होतं, त्यामुळे अभिनेत्याची शुक्रवारी सुटका करणं शक्य नाही, असं तुरुंग प्रशासनाने नमूद केलं होतं. अखेर आज (शनिवारी, 14 डिसेंबरला) सकाळी त्याची सुटका करण्यात आली.
तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन शुक्रवारी संध्याकाळपासून सुटकेची वाट पाहत होता. त्याला शुक्रवारची रात्र तुरुंगात काढावी लागली. तुरुंगाच्या नियमांनुसार त्याला रात्रीचे जेवण देण्यात आले. त्याला बेड आणि उशीही देण्यात आली. रात्रभर तो थोडा अस्वस्थ असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याच्या बॅरेकमध्ये तो कधी चालताना तर कधी झोपेत सतत कूस बदलताना दिसून आला. तो सुटण्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितले होते. तो नीट जेवलाही नाही. रात्री उशिरापर्यंत तो जागेच होता. मात्र, कारागृहाबाहेर त्याच्या चाहत्यांची गर्दी झाली होती.आता प्रश्न असा आहे की तेलंगणा उच्च न्यायालयाने शुक्रवारीच अंतरिम जामीन मंजूर केला होता मग अल्लू अर्जुनला शुक्रवारची रात्र तुरुंगात का काढावी लागली? याचे कारण शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कारागृह अधिकाऱ्यांना जामिनाची प्रत मिळू शकली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जामीन बॉण्डची प्रत मिळाली असती तरी आधी त्याची तपासणी करावी लागली असती. त्यामुळेच शुक्रवारी जामीन मिळणे शक्य नव्हते. शनिवारी सकाळी सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अल्लू अर्जुन तुरुंगातून बाहेर आला. आदल्या दिवशी, उच्च न्यायालयाने अभिनेता अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर केला होता आणि या प्रकरणाच्या तपासात अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते.






