Bollywood Breaking: अल्लु अर्जुन संदर्भात दोन मोठ्या ब्रेकिंग अपडेट… काय आहेत दोन मोठ्या Update… एक मंजूर झाला जामीन आणि दुसरी…?
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या ‘पुष्पा २: द रुल’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. 4 डिसेंबर 2024 रोजी हैदराबाद येथे या सिनेमाचा प्रीमिअर शो झाला. या प्रीमिअरसाठी अल्लू अर्जुन अचानक थिएटरमध्ये पोहोचल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. चाहत्यांना त्याला जवळून पाहण्याची उत्सुकतेमुळे थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसेच तिचा मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच या प्रकरणी अल्लू अर्जुनला आज अटक करण्यात आली आणि त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. या अटकेपासून सुटका मिळवण्यासाठी अल्लू अर्जुनने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली. अशातच अल्लू अर्जुनसाठी एकाच वेळी आता दोन आनंदाच्या बातम्या आल्या आहेत.
या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली असून ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेचा पती भास्कर अल्लू अर्जुनविरोधातील तक्रार मागे घेण्यास तयार आहे. चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाल्याची मला कल्पना नाही. चेंगराचेंगरीच्या घटनेशी अल्लू अर्जुनचा काहीही संबंध नाही. त्याचबरोबर तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनचा जामिन मंजूर केला आहे. मात्र आजची रात्र तुरुंगात रहावे लागेल.
याच प्रमाणे आरटीसी एक्स रोड येथील संध्या थिटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दोन प्रेक्षकांच्या मृत्यूनंतर अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता पोलिसांनी त्याला अटक केल्याचं समोर आलं होत. पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 आणि 118(1) अंतर्गत अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी थिएटर मालकांपैकी एक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि एक कर्मचारी अशा तिघांना अटक केली होती.
संध्या थिएटरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असून यात मृत्युमुखी झालेल्या महिलेच्या कुटुंबियांप्रती अल्लू अर्जुन ने संवेदना व्यक्त केली आहे. या कठीण काळात त्यांच्याबरोबर आहे. त्यांनी स्वतःला एकटं समजू नये लवकरच या कुटुंबाची अल्लु अर्जुन भेट घेईल. आर्थिक मदतीचे आश्वासन अल्लू अर्जुनने दिले आहे.






