Amalner

Amalner: छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहा वरील महाराजांच्या तुटलेल्या नावाची दुरुस्ती साठी शिवप्रेमींनी नगरपरिषदेवर काढला मोर्चा…

Amalner: छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहा वरील महाराजांच्या तुटलेल्या नावाची दुरुस्ती साठी शिवप्रेमींनी नगरपरिषदेवर काढला मोर्चा…

अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नाट्यमंदिरावरील महाराजांचे नाव तुटलेले असून या संदर्भात वारंवार नावाची दुरुस्ती करण्यासंदर्भात सांगून देखील नावाची दुरुस्ती केली गेली नाही.परिणामी शिवप्रेमींनी अमळनेर नगर परिषदेवर मोर्चा काढून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी मुख्याधिकारी यांनी दुरुस्तीचे काम ७ डिसेंबर रोजी सुरू करून दोन दिवसात पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.

नाट्य मंदिरावरील टाकलेले नाव दुरुस्त करण्यासाठी सूचना देवून ही याची दखल न घेतल्याने शिव भक्तांनी नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर हे काम करण्यात यावे अशी विनंती निवेदन देऊन केली. यावेळी अमर पाटील, सागर पाटील, शुभम पाटील, सुदीप पाटील, गोपाल पाटील, आबीद पठाण, भूषण लोहार, दुर्गेश पाटील, बंटी पाटील, भटू पाटील, जगन पाटील, चेतन पवार, सागर सुतार इ उपस्थित होते.

Amalner: छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहा वरील महाराजांच्या तुटलेल्या नावाची दुरुस्ती साठी शिवप्रेमींनी नगरपरिषदेवर काढला मोर्चा...

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button