भारतीय सैनिक म्हणून देश सेवा करणे अत्यंत अभिमानास्पद- शिवम हिवरे
फैजपुर प्रतिनिधी
अवघ्या विश्वातील सर्वोत्तम सैन्यांपैकी भारतीय सैन्य मान्यता प्राप्त असून पीस एरिया ते फिल्ड एरिया कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्याने देशभक्ती आणि शूरत्व याचा प्रत्यय वेळोवेळी दिला असून युवकांनी मोठ्या संख्येने भारतीय सैन्यात सहभागी होऊन देशसेवा करण्याचे महत् भाग्य पदरी पाडून घ्यावे. भारतीय सैनिक असल्याचा प्रचंड अभिमान वाटतो असे गौरवोद्गार नुकत्याच अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात दाखल झालेल्या व सद्यस्थितीत जम्मू कश्मीर येथे देशसेवा बजावणाऱ्या शिवम हिवरे यांनी मनोगत व्यक्त केले.
ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय व 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *आर्मे फोर्सेस फ्लॅग* दिवसाच्या औचित्याने आयोजित *समजून घेऊ भारतीय सेना* या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव च्या वतीने हवालदार जॉन मोहम्मद, अर्थशास्त्र व बँकिंग विभाग प्रमुख डॉ राजेंद्र ठाकरे, यांच्यासहित एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत व कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे व 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव चे समादेशक अधिकारी कर्नल अभिजीत महाजन, प्रशासकीय अधिकारी कर्नल अश्विन वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवला.
आर्म फोर्सेस फ्लॅग डे च्या निमित्त कॅडेट्सला भारतीय सशस्त्र सेनेत भरती होण्याची आवड निर्माण व्हावी व भारतीय सेनेची कार्यपद्धती सोबत आतापर्यंत शहीद झालेल्या भारतीय वीर हुतात्म्यांचे स्मरण व कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैनिक देशसेवा बजावतात याबाबतीत स्व अनुभव कथनातून माहिती होण्याच्या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले. त्यात कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू व भारतीय सैनिकांचे कार्यकर्तृत्व यासहित 1947 पासून तर कारगिल युद्ध आणि डोकलाम संघर्ष येथ पर्यंत भारतीय सैनिकांनी गाजवलेले शूरत्व याविषयी उपस्थितांना माहिती दिली व मोठ्या संख्येने भारतीय सैन्यात अधिकारी पदी भरती होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिनियर अंडर ऑफिसर ऋषिकेश पाटील, सिनियर अंडर ऑफिसर रोनीत तायडे, ज्युनिअर अंडर ऑफिसर ओम सिंग राजपूत, कॅडेट यश कोळी, कार्पोरल वीरेंद्र जैन यांनी परिश्रम घेतले.






