Amalner: मंगरूळ येथील तरूणाच्या खून प्रकरणात प्रियकरासह पत्नीला अटक : पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात आज सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळला. तपासाअंती सदर मृतदेह तुषार चिंधू चौधरी वय ३७ रा.मारवड ता.अमळनेर ह.मु. प्रताप मील, अमळनेर या तरूणाचा असल्याचे निष्पन्न झाले. सकाळी सकाळी मंगरूळ शिवारात मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती.सदर खून असल्याचे प्राथमिक अंदाज लावण्यात आला होता. पोलिस अधिक्षक डॉ रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेवून सदर खून अनैतिक संबंधातून तरूणाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली असल्याचे सांगितले.त्यानुसार पोलीसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे फरार झालेला संशयित आरोपी प्रियकर सागर चौधरी वय-३५ रा.दोंडाईचा जि. धुळे आणि मयताची पत्नी पुजा तुषार चौधरी रा. प्रताप मिल, अमळनेर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अवघ्या काही तासांत पोलिसांनी सदर घटनेचा तपास लावण्यात यश संपादन केले आहे.






