Nandurbar

कुठल्याही शासन आदेश नसतांना भोणे येथे ग्रामस्थांकडून, ग्रामसेवक करीत आहे अवैधरित्या पैशांची वसुली

कुठल्याही शासन आदेश नसतांना भोणे येथे ग्रामस्थांकडून, ग्रामसेवक करीत आहे अवैधरित्या पैशांची वसुली

नमुना ८ नं ऑनलाईन करण्याच्या नावाखाली ग्रामसेवक करीत आहे. पैशांची अवैध वसुली, खानदेश क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर

नंदूरबाr- शेख फहीम मोहम्मद

सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार तालुक्यातील भोणे गावात नमुना ८ नं ऑनलाईन करण्याच्या नावाखाली पैशांची अवैध्य वसुली एका खाजगी संस्थेच्या इसम, ग्रामपंचायत शिपाई व ग्रामसेवकाकडून करण्यात येत आहे. खासगी संस्थेच्या इसम, ग्रामपंचायत शिपाई, ग्रामसेवक असे तिघेजण घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीकडून अवैधरित्या पैसे वसुली करीत आहे. याबाबत नमुना ८ नंबर ऑनलाईन करण्याच्या कुठल्याही शासन आदेश नसतांना भोणे येथील ग्रामस्थांनाकडून अवैधरित्या पैशांची वसुली करण्यात येत आहे. तसेच सुमारे 90% लोकांकडून अवैधरित्या पैसे वसूल करण्यात आले असून गावातून या गोष्टीला विरोध झाल्यानंतर सदर विषयी चर्चा झाला अखेर काल दिनांक ०४ डिसेंबर 2024 रोजी खानदेश क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावन कुमार यांना निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की तिघांवर गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई करावी, कारवाई नाही झाल्यास आम्ही तिर्व स्वरूपाचे आंदोलने उपोषणे करेल असा इशारा निवेदनात नमूद करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button