Amalner

Amalner: धरती माता महिला शेतकरी गट राज्यस्तरीय अग्रोवल्ड पुरस्काराने सन्मानित..

Amalner: धरती माता महिला शेतकरी गट राज्यस्तरीय अग्रोवल्ड पुरस्काराने सन्मानित..

अमळनेर येथील पिंपळे खु आणि खोकरपाट येथील महिला शेतकरी गटाला राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.ॲग्रोवल्डतर्फे फार्मर कप स्पर्धेत भाग घेवून शेतीचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या धरती माता महिला शेतकरी गट, पिंपळे खु. आणि शंभू महिला शेतकरी गट, खोकरपाट या दोन गटांना राज्यस्तरीय अग्रोवल्ड पुरस्कार खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात ॲग्रोवल्ड ही संस्था काम करते. या संस्थेच्या माध्यमातून जळगाव येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळे शेती विषयक स्टॉल असतात. जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना, गटांना ॲग्रोवल्ड पुरस्कार देवून सन्मानित केले जाते.सदर पुरस्कार मिळाल्याने पिंपळे येथील लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी देखील सर्व महिलाचे कौतुक केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button