Amalner: प्राथ.आरोग्य केंद्र आणि पालिका रुग्णालय तर्फे 73 हजार बालकांना जंत नाशक गोळ्यांचे वाटप..
अमळनेर जंत नाशक दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पालिका रुग्णालय यांच्या तर्फे 73 हजार लहान मुलांना जंत नाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
पोटातील जंतापासून इतर आजारांची लागण होवू नये व बालकांचे या आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येतात.त्यात राष्ट्रीय जंत नाशक दिनानिमित्त अमळनेर तालुक्यातील 0 ते 19 वयोगटातील सुमारे 73 हजार लहान बालकांना आरोग्य विभागामार्फत जंत नाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.
जंत नाशक दिनानिमित्त तालुक्यातील पाच आरोग्य केंद्र,सर्व उप केंद्र, शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र व पालिका रुग्णालय, अंगणवाडी,जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा,माध्यमिक शाळा,विना अनुदानित शाळेत शिक्षण घेणाऱ्या 0 ते 19 वयोगटातील 78 हजार 893 बालकांना मोफत जंत नाशक गोळ्यांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी आरोग्य विभागाने 73 हजार 131 बालकांना जंत नाशक गोळ्यांचे वाटप केले तर उर्वरित 7 हजार 762 बालकांना दुसरया टप्प्यात गोळ्या वाटप होणार आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी यांनी दिली आहे.






