Election Update: लोकशाहीला लागलेला कलंक..EVM…
- अवधान गाव.. कुणाल बाबा ला 0 मतदान दाखवत आहे.. जे गाव 70% त्यांच्या संस्थेत काम करते.. कट्टर कार्यकर्ते आहेत.. आंदोलन करत आहेत ते लोक..
- नक्कीच घोटाळा एका गावातील मतदान 1645 आहे आणि मतदान झाले 2100 हे कसे.
काल झालेल्या निवडणुकीत सर्वच भागातून ज्या काही EVM मशीन बद्दल तक्रारी आल्या आहेत त्यातील जास्त करून कंट्रोल युनिटच्या बॅटरी बद्दल होत्या . २० तारखेला मतदान संपल्या नंतर त्यातील बॅटरी वापर झाल्यामुळे ६० – ६५ % पर्यंत आलेली असताना तेच मशीन पुन्हा २३ तारखेला मतमोजणी च्या दिवशी ९९ % पेक्षा जास्त बॅटरी चार्जिंग कसे दाखवू शकते ? म्हणजेच एकतर मशिन्स बदलल्या गेल्या असाव्यात किंवा कंट्रोल युनिट च्या प्रोग्राम मध्ये काही तरी बदल करून मतांमध्ये फेरबदल केलेले असावेत हे स्पष्ट होते .अनेक ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर गाडीमध्ये आधुनिक मशिन्स राउटर.. वै सापडले आहेत . हे सर्व काय दर्शवते ?
तुम्ही सर्व स्वतःच्या हृदयावर हात ठेवून आपल्या आई वडिलांना व देशासाठी ज्या महापुरुषांनी व जनतेने बलिदान दिले अश्या सर्वांना स्मरून खरंच ‘महाविकास युती’ जिंकली आहे का याचे आत्मचिंतन करा …
आपल्याला देशात लोकशाही जिवंत ठेवायची आहे हे सर्वात महत्वाचे आहे . अन्यथा भविष्यात असेच EVM च्या सहाय्याने गैरप्रकार होत राहतील व देशद्रोही शक्ती देशावर कब्जा करून जसे ब्रिटिशांनी देश लुटला त्याच प्रमाणे देश लुटत राहतील . अनेक लोकांच्या व महापुरुषांच्या त्याग व बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य व संविधान मिळाले आहे . त्यांची भलीमोठी किंमत या देशातील जनतेने यापूर्वीच भोगली आहे . तुम्ही जर हा अन्याय असाच उघड्या डोळ्यांनी पहात बसताल तर देश पुन्हा गुलामीत जाण्यास वेळ लागणार नाही हे लक्षात असू द्या . राजकीय पक्ष कोणताही सत्तेत येऊ द्या त्याबद्दल काहीच दुमत नाही पण त्यासाठी योग्य ,न्याय्य प्रामाणिक मार्ग निवडलेला असला पाहिजे . अन्यथा अश्या प्रकारे गैरमार्गाने निवडणुका जिंकून आलेले राजकीय पक्ष व त्याचे नेते देश विकायला मागेपुढे पाहणार नाही . तेव्हा सर्वांनी आपल्या सदविवेक बुद्धीला स्मरून योग्य तो निर्णय घ्यावा व देश वाचवावा . आपला देश खूप भयानक संकटातून जात आहे .






