Chandwad

वेदांता इंग्लिश मिडीयम मध्ये बक्षीस वितरण चांदवड मधील संपन्न.

वेदांता इंग्लिश मिडीयम मध्ये बक्षीस वितरण चांदवड मधील संपन्न.

चांदवड विजय जाधव

दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी वेदांता इंग्लिश मेडियम स्कूल चांदवड येथे वार्षिक बक्षीस वितरण समारंभ साजरा झाला. सकाळी ठीक १०.३० वाजता शाळेच्या अंगणात कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र हास्य श्री व लाफ्टर आंबेसेडर पुरस्कार प्राप्त असे मा. श्री राजेंद्र भंडारी सर उपस्थित होते. त्यांनी मुलांसाठी वेगवेगळे हास्य प्रकार घेऊन जीवनात हसण्याचे महत्त्व पटवून दिले. दुःखी न राहता सतत हसत रहा प्रत्येक काम हसतमुखाने करा असे त्यांनी मुलांना सांगितले. मुलांनीही अतिशय उत्साहात सर्व हास्य प्रकार केले.
सुरवात श्री गणेशाच्या प्रतिमेचं पुजन करुन झाली, व त्या नंतर क्रीडा व कौशल्यावर आधारित विविध स्पर्धामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संचालक श्री. बाळकृष्ण कावळे सर, संस्थापक श्री. विजय जाधव सर, मुख्याध्यापिका सौ. मोनाली सिसोदिया मॅडम व सर्व शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सोनाली आहेर मॅडम व आभार प्रदर्शन सौ.मोनाली शिंपी मॅडम यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button