Amalner: तेज ज्ञान फाउंडेशन तर्फे रजत जयंती ध्यान महोत्सवाचे रविवारी आयोजन..
हॅपी थॉट्स नावाने ओळखली जाणारी तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन ही आध्यात्मिक सेवाभावी संस्था आपल्या स्थापना दिनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात प्रवेश करत आहे. या विशेष प्रसंगी, तेजज्ञान फाउंडेशन, नाशिक तर्फे २४ नोव्हेबर २०२४ रोजी रविवारी IMA हॉल जी एस हायस्कूल अमळनेर येथे सकाळी 9.30 ते 12.00 यावेळेत’रजत जयंती ध्यान महोत्सव सिल्व्हर ज्युबिली सेलिब्रेशन) आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि आणि उद्घाटन प्रा डॉ शिवाजीराव पाटील, माजी कुलगुरू उमवी, प्रा.डी डी पाटील, माजी विभाग प्रमुख तत्त्वज्ञान मानसशास्त्र तर्कशास्त्र विभाग,श्रीमती उर्मिला अग्रवाल, पतंजली योग शिक्षिका उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सत्याचार्य सरला जगदाळे, तेजसेवक चंद्रकांत जगदाळे, विश्वास चौधरी, गुलाब महाजन, समाधान पारधी यांनी केले आहे.सदर शिबिर विनामूल्य असून नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा.






