Amalner: प्रशासन सज्ज… उद्या मतमोजणी..
अमळनेर विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया दि. 20 रोजी शांततेत पार पडली.उद्या दि. 23 रोजी मतमोजणी होणार असून अमळनेर महसूल विभाग सज्ज झाला आहे.
मतमोजणी एकूण 23 टेबलांवर होणार असून यापैकी 6 टेबलांवर टपाली मतमोजणी, 3 टेबलांवर ETPBS म्हणजे सैनिकांनी केलेल्या ऑन लाईन मतमोजणी होणार आहे. याकामी महसूल प्रशासनाचे जवळपास 200 कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
मतमोजणी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. निकाल दुपारी तीन वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. या सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून सूक्ष्म निरीक्षकांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सुध्दा सज्ज झाले असून याकामी जवळपास १० पोलिस अधिकारी,७० पोलिस कर्मचारी, २० CRPF व २० SRPF पोलिस जवान दिमतीला असणार आहे.






