Amalner: हार जीतचा लपंडाव उद्या संपणार…! तिरंगी लढतीत कोण होणार आमदार..!
अमळनेर विधानसभा निवडणूक 2024 नुकतीच पार पडली.या निवडणुकीत विकासापेक्षा पैशांचा पाऊस पडला त्यामुळे कोण जिंकेल याबाबत तालुक्यात मोठी उत्सुकता आहे.संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अमळनेर मध्ये रेकॉर्ड ब्रेक पैसे वाटले गेल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात माजी आमदार शिरीष दादा चौधरी (अपक्ष), अनिल पाटील राष्ट्रवादी शिंदे गट, तर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अनिल नथु शिंदे उतरले होते. तिनही उमेदवारांनी विजय आपलाच होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
अमळनेर विधानसभा निवडणुकीत 65% मतदान झाले असून जिंकणारा उमेदवार फार थोड्या फरकाने विजयी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मतदारांचा कौल अवघ्या काही तासांत दिसून येणार आहे. अमळनेर विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.






