Amalner: मतदान जनजागृतीचे विविध उपक्रम राबविणाऱ्या शाळा संस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या च्या हस्ते सन्मान..
अमळनेर नुकतीच तालुक्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या.निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत मतदान आयोगाच्या मार्गदर्शनानुसार स्विप कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत अमळनेर तालुक्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.यात विविध प्रकारे मार्गदर्शन, पत्र लेखन, रांगोळी स्पर्धा,गृहभेटी, जनजागृती, घंटा गाडीवर मतदानास आवाहन करणारे जिंगल/गीत प्रसारण करणे, सावत्रिक ठिकाणी मतदान जनजागृती पर बॅनर लावणे, मॅरेथॉन स्पर्धा, बचत गटातील महिलांची केंद्रस्तरीय कार्यशाळा, गावपातळीवर होणारे विविध कार्यक्रमात शपथ घेणे इ कार्यक्रमाची आखणी व नियोजन अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन.आर.पाटील,गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील तसेच विशेष शिक्षक श्री किशोर पाटील यांनी तालूक्यातील सर्व शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांकडून करून घेतले. त्याबद्दल माननीय जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.






