श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड चांदवड येथे भव्य आदिवासी महिला व युवक मेळावा संपन्न…
चांदवड विजय जाधव
आज शुक्रवार , दिनांक – १५ नोव्हेंबर २०२४ ( कार्तिक पौर्णिमा ) जनजाती कल्याण आश्रम ,भगवान बिरसा मुंडा जयंती ,राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस निमित्ताने श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड चांदवड येथे ” भव्य आदिवासी महिला व युवक मेळावा ” आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय धावपटू / सावरपाडा एक्स्प्रेस कविता ताई राऊत व चंद्रेश्वरगडाचे महंत स्वामी जयदेवपुरीजी महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर मुख्य वक्ते म्हणून युवराज लांडे , गणेश सरोदे , राजेंद्र पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. डॉ. सुरेश पाटील ( भाजपा शिक्षक आघाडी समन्वयक ) , कैलास गुंजाळ ( सरपंच न्हनावे ) संजय पाडवी ( जिल्हाध्यक्ष भाजपा आदिवासी मोर्चा नाशिक जिल्हा ) रूपेश पवार , विजय जाधव ( भाजपा शिक्षक आघाडी मंडल अध्यक्ष ) विजय वाघ ( आदिवासी मोर्चा तालुका सरचिटणीस ) अमोल भारती आदींनी प्रमुख उपस्थिती नोंदवली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन जनजाती कल्याण आश्रम चांदवड देवळा टीम चे सदस्य निलेश पवार , गोकुळ तांदळे , रोहित पवार , महेश शिंगरे , जालिंदर गांगुर्डे , सागर पवार , चेतना कुंवर यांनी केले.






