त्या विजयात राजेश भाऊ वानखेडे यांचा सिंहाचा वाटा: यंदाची निवडणूकीत देखील त्यांची भुमिका निर्णायक
सावदा ता.रावर प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- सर्वधर्मसमभाव व सर्वसमावेशकतेला प्रथम प्रधान्य देऊन सर्व जातींच्या लोकांना सोबत घेऊन माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ वानखेडे यांनी आपल्या सामाजिक व राजकीय जीवनाची सुरुवात केली.व आजही त्यांच्या कार्यशैलीत सदरील बाबी केंद्र स्थानी दिसून येते.यामुळे त्यांना मानणारे अनेक कार्यकर्ते,समर्थक व हितचिंतकांची इतरांना हेवा सुटेल असे संख्याबळ निर्माण झाले.तरी याच गोष्टींच्या आधारेच राजेश भाऊ वानखेडे यांनी सावदा नगरपालिकेची निवडणुक सन २००२ मध्ये जिंकून या पालिकेवर असलेली वंशपरंपरागत सत्ता बदलून एक इतिहास रचलेला आहे.परिणामी अनेक वर्षांनंतर सदरील पालिकेत राजेश वानखेडे यांची आई ताराबाई गजनन वानखेडे या अल्फसंख्यांक समाजाची महिलेस सावदा शहराची नगराध्यक्षा होण्याचा मान मिळाला.
तसेच खासदार शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केल्यापासून माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ वानखेडे हे राष्ट्रवादी पक्षात असताना सुरवाती पासून राजेश भाऊ वानखेडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक व अतिशय विश्वासू होते व आहे.रावेर तालुक्यासह ठिकठिकाणी सदरील पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली होती व आहे.आपल्या कुशल कार्यशैलीच्या जोरावर त्यांची ओळख गल्लीपासून ते दिल्ली पर्यंत असून,नागपूर विद्यापीठ आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य देखील आहे.तसेच माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ वानखेडे हे आजही अजितदादा पवार गटा असून,सावदा शहर सह संपूर्ण मुक्ताईनगर मतदारसंघात असलेल्या प्रतेक गावात त्यांना मानणारे कार्यकर्ते,समर्थकांची संख्या अधिक प्रमाणात आहे.यात दुमत नाही.असे मत राजकीय जाणकारांचे आहे.
*चर्चेला उधाण:यंदा निवडणुकीत राजेश वानखेडे कोणाला साथ देणार?*
गत विधानसभेच्या निवडणुकीत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली असता खासदार शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या पाठिंब्यामुळे विजयश्री खेचली.सदरील विजयात राजेश भाऊ वानखेडे आणि त्यांच्या चाहत्या वर्गाचा यात मोलाचा वाटा होता.परंतू यंदाची विधानसभा निवडणूकीचा बिगूल वाजला महायुती शिंदे गटा तर्फे पुन्हा आमदार चंद्रकांत पाटील तर महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत उमेदवार रोहिणी ताई खडसे आणि अपक्ष म्हणून उद्योजक विनोद सोनवणे देखील निवडणुकीच्या रिंगणात असून,सध्या प्रचारही सुरू झाले.तसेच फक्त मतदानाला ८ दिवस उरले तरी आपल्या मागे कार्यकर्ते व समर्थकांची मोठी संख्या असलेले हरहुन्नरी राजेश भाऊ वानखेडे आता स्वत:चे राजकीय वजन उरलेल्या काही दिवसात कोणत्या उमेदवाराचा विजय मार्ग सुकर होण्यासाठी वापरणार याबाबत लोकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येते.तसेच यादरम्यान सावदा येथील महायुतीचे कार्यकर्ते सध्या महाविकास आघाडीच्या प्रचारात दिसत असले तरी ज्या वेळी राजेश भाऊ वानखेडे यांची अद्यापही स्पष्ट न झालेली भुमिका देखील कोणत्या उमेदवारासाठी तारक ठरेल आणि कोणत्या उमेदवाराला फटका बसेल याबाबतची चर्चेला देखील उधाण आलेले आहे.






