चांदवड देवळा विकास आघाडीच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचा डॉ राहुल आहेरांना पाठिंबा
दत्ता गांगुर्डे,श्रीराम जाधव आदी. पदाधिकाऱ्यांनी दिला जाहीर पाठींबा
चांदवड प्रतिनिधी -विजय जाधव
शिवसेना पक्षाचे राजीनामे देत चांदवड देवळा विकास आघाडी उभारत आपल वेगळ अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आज आघाडीतून बाहेर पडत महायुती चे अधिकृत उमेदवार डॉ. राहुल आहेर यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या कार्यालयात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, गणपत ठाकरे, रिपाइं चे राजाभाऊ आहिरे, संदीप उगले आदी. पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षात आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या मार्फत तालुक्यात विविध विकासकामे झाले आहेत. विविध शासकीय योजना राबविण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. विशेषतः लाडकी बहिण योजनेचा तालुक्यातील महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी आमदार राहुल आहेर यांनी विविध गट, गणात मेळावे घेत विक्रमी संख्येत लाडक्या बहिणींना लाभ मिळवून दिला. मतदार संघातील रस्ते, वीज, पाणी आणि पायाभूत सुविधांसाठी त्यांनी केलेले काम राहुल आहेर यांना पाठींबा देण्यासाठी प्रेरित करत असल्याचं दत्ता आबा गांगुर्डे, श्रीराम जाधव यांनी सांगितले.
येत्या २० तारखेला राहुल आहेर यांच्या कमळ या निशाणी समोरील बटण दाबून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन देखील त्यांनी केली. यासाठी आजपासून राहुल आहेर यांच्या प्रचार दौऱ्यात आपण सहभागी होत असल्याचे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेस दत्तात्रय आबा गांगुर्डे, श्रीराम जाधव, एकनाथ गांगुर्डे, विक्रम पगार, साहेबराव गांगुर्डे, जालिंदर बिडगर, राहुल गवारे, हेमंत केकान, माणिक बोडके, साहेबराव केकान, वैभव कासव, निवृत्ती कऱ्हे, कैलास जेजुरे, आप्पा कऱ्हे, विकास नवले, संदीप नवले, बापू कांगुणे, राहुल नवले आदी. पदाधिकारी उपस्थित होते.






