Maharashtra

Breaking: रणधुमाळी 2024: यंदाच्या निवडणुकीत भाऊगिरी…! घराणेशाही सुरू…या भावांच्या जोड्या रिंगणात…

Breaking: रणधुमाळी 2024: यंदाच्या निवडणुकीत भाऊगिरी…! घराणेशाही सुरू… या भावांच्या जोड्या रिंगणात…

महाराष्ट्र: सध्या 15 व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर प्रचार सुरू झाला आहे. येत्या 20 तारखेला मतदान होणार असून मोठ्या पक्षांमध्ये फूट पडल्याने घरांमध्ये ही फूट पडली आहे. यामुळे एकाच घरातील एकमेकांविरुद्ध सख्खे चुलत भाऊ- बहीण निवडणुकीच्या रणधुमाळीत उभे ठाकले आहेत. यात खालील महत्वपूर्ण जोड्या खालील प्रमाणे..

शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्री उदय सावंत यांना रत्नागिरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांचे भाऊ किरण सामंत यांना राजापूर मतदार संघात तिकिट देण्यात आलंय. किरण सामंत लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक होते. पण नारायण राणे यांच्यामुळे किरण सामंत यांना माघार घ्यावी लागली.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार यांना तर बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. युगेंद्र पवार यांचा सामना काका अजित पवार यांच्याशी होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

कोकणात राणे बंधुंना विधानसभेची तिकिटं देण्यात आली आहेत. नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून तर निलेश राणे यांना मालवण-कुडाळ मतदारसंघातून तिकिट मिळालं आहे. मालवण-कुडाळ ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याने निलेश राणे यांनी भाजपामधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

चांदवड-देवळा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर (Dr Rahul Aher) यांना भाजपकडून तिकिट देण्यात आलं आहे. तर नाफेडचे संचालक केदानाना आहेर (Keda Aher) हे अपक्ष निवडणूक लढवत आहे. त्यामुळे विधानसभेच्या आखाड्यात भाऊबंदकीची कुस्ती पाहायला मिळणार आहे.

काँग्रेसने लातूर विधआनसभा मतदारसंघात पुन्हा एकदा देशमुख बंधुंवर विश्वास दाखवला आहे. लातूर शहरातून अमित देशमुख तर लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button