Amalner

Amalner: वऱ्हाड निघालयं मतदानाला..! शिरीष चौधरींची घोड्यावरून निघाली वरात..

Amalner: वऱ्हाड निघालयं मतदानाला..! शिरीष चौधरींची घोड्यावरून निघाली वरात..

अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी. यांचा तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू असून त्यांना जनतेचा भरघोस प्रतिसाद आणि पाठींबा मिळत आहे.
काल दि ८ रोजी तालुक्यातील 42 खेड्यातील जामदे-भोलाणे इ गावात प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ठिकठिकाणी माता भगिनींनी ओवाळून आशीर्वाद दिले. ग्रामस्थांनी ही प्रचारात सहभागी होत मोठा प्रतिसाद दिला. यावेळी सर्वात महत्त्वाच्या विषय ठरला तो शिरीष चौधरी यांची प्रचारादरम्यान घोड्यावरून गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मिरवणूक काढत वाजत गाजत संपूर्ण गावात मोठा उत्सव साजरा केला. यावरून असे निदर्शनास येते की तालुक्यातील 42 गावात शिरीष चौधरी यांना मोठा पाठिंबा असेल असे दिसून येते.

तालुक्याचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी मतदारसंघात यंदा पुन्हा परिवर्तनासाठी शिरीष चौधरी यांना विजयी करा असे आवाहन शिरीष चौधरी मित्र परिवराकडून करण्यात येत आहे.
यावेळी माजी सरपंच. शिवाजी पाटील, मगन बापू, सरपंच संभाजी पाटील, वसंत नगरचे पप्पू जाधव, हरी कृष्ण पाटील, वाल्मीक पाटील, हिरापूर गोकुळ चौधरी,भीमराव पाटील, बटू आटकर, अर्जुन बिल, अतुल भिल, किशोर पाटील, शिवाजी पाटील, दिनेश पाटील, संदीप पाटील, दीपक पाटील, मनोहर पाटील. इ. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button