Amalner: निवडणूक निरीक्षकांची सीमेवरील मतदान केंद्रांना भेट.. तरुण मतदारांशी साधला संवाद…
अमळनेर : विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निरीक्षकांनी तालुक्याच्या सीमेवरील तीन मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद देखील साधला.
अमळनेर तालुक्यातील लांब आणि सीमेवर नदी काठावरील कामतवाडी , गंगापुरी आणि नीम या तीन मतदान केंद्राना निवडणूक निरीक्षक रंणजितसिंग यांनी भेट दिली. या तिन्ही मतदान केंद्राची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. यावेळी त्यांनी युवा मतदारांशी संवाद साधत चर्चा केली. जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन देखील केले.त्यांच्या बरोबर प्रांजल पाटील , श्रीकांत चिखलोदकर , सेक्टर अधिकारी , सरपंच ,ग्रामसेवक,तलाठी, बीएलओ हजर होते.






