Faizpur: अमरावती येथील राज्यस्तरीय आव्हान शिबिरात विद्यापीठाचा संघ रवाना
फैजपूर प्रतिनिधी
नॉट मी बट यु या ब्रीद नुसार विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवून, समाजाप्रती उत्तरदायित्व व समाजउत्थानात भरीव योगदान देण्याच्या उदात्त हेतूने स्थापित व कार्यरत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना एककाचा सहभाग विविध उपक्रमात होत असतो. याचाच एक भाग म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव जिल्हा संघ *चान्सलर ब्रिगेड राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर आव्हान-2024 साठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडे रवाना झाला.
अत्यंत प्रतिष्ठित व उपयुक्त अशा या शिबिरासाठी विद्यापीठ संलग्नित विविध महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उस्फूर्तपणे सहभागी झाले. याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे रजिस्ट्रार प्रा. डॉ. विनोद जी पाटील, एन एस एस संचालक प्रा. डॉ. सचिन जी नांद्रे, जिल्हा संघ व्यवस्थापक तथा धनाजी नाना महाविद्यालयातील हिंदी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सतीश दत्तात्रय पाटील, महिला संघ व्यवस्थापक प्रा. डॉ. जयश्री भिरुड, नूतन मराठा महाविद्यालय प्राचार्य डॉ एल पी देशमुख, एन एस एस पी ओ मा. प्रा. डॉ. राजू पाटील, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व एनएसएसचे स्वयंसेवक- स्वयंसेविका उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सहभागी संघ प्रमुख व स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या.






