Amalner

Amalner: विविध रंगांनी नटली बाजारपेठ.. दिवाळीच्या दिवशी बाजारपेठेत तुफान गर्दी…

Amalner: विविध रंगांनी नटली बाजारपेठ.. दिवाळीच्या दिवशी बाजारपेठेत तुफान गर्दी…

अमळनेर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अमळनेर बाजार फुलला असून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आज दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने बाजारपेठ विविध वस्तूंनी आणि माणसांनी गजबजलेली आहे. अमळनेरचा बाजाराचा पट्टा चांगलाच गाजबलेला आहे. विविध वस्तू बाजारात विक्रीला असून यात झेंडूची फुले, पणत्या, रांगोळी, रेडिमेड कपडे, झाडू, टोपल्या, लाह्या,बत्तासे इ घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. बाजारपेठेत रोषणाईने युक्त कंदील, तोरणे, लायटिंग इ नी सजली आहे.

तालुक्यात यंदा ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती. कारण गरजेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकरी राजा विवंचनेत असला तरी दिवाळीच्या सणाचा उत्साह मात्र सर्वत्र आढळून येत आहे. एकी कडे निवडुकीचा बिगुल वाजला आहे आणि थोड्या फार प्रमाणात का असेना राज्यकर्त्यांचा हाथ ढिला झाला आहे. यामुळे निच्छितच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. नोकरदार वर्ग ही खुश आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर विविध इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कार, टु व्हिलर, मोबाईल फोन ई वर भरघोस सुट मिळाली आहे. तसेच विविध बँक कर्ज देण्यासाठी ऑफर घेवून आल्या आहेत. याचा चांगला परिणाम बाजारपेठेवर झालेला दिसून येत आहे. मोबाईल खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली असून ग्राहकांनी सॅमसंग, ओप्पो इ फोन ला पसंती दिली आहे. यंदा i phone चे मार्केट मात्र कमी झाले आहे. TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, होम डेकोर च्या वस्तू, सोफा सेट ई देखील मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे. सोने चांदी चा भाव जरी वाढला असला तरी सोने चांदी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. गुरुपुष्य अमृत दिनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी झाल्याची माहिती पारस गोल्डचे मालक संदीप थोरात यांनी दिली.

सर्वात जास्त प्रमाणात छोट्या छोट्या वस्तू, दैनंदिन व्यवहारात उपयोगात येणाऱ्या घेण्या कडे ग्राहकांचा कल आहे. कृत्रिम फुलांच्या माळा , तोरणे, कृत्रिम फुले, शोभेच्या वस्तू ई महिला वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याची माहिती श्याम जनरल चे मालक मुकेश किशोर लुल्ला यांनी दिली तर झेंडूच्या फुलांचे होलसेल विक्रेते अक्षय महाजन यांनी देखील आज झेंडूच्या फुलांची विक्रमी विक्री झाल्याची माहिती दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button