Amalner

Amalner: रणसंग्राम 2024: टायगर अभी जिंदा है..! मा. शिरीषदादा चौधरी अपक्ष लढणार… पत्रकार परिषदेत दिली माहिती..!

Amalner: रणसंग्राम 2024: टायगर अभी जिंदा है..! मा. शिरीषदादा चौधरी अपक्ष लढणार… पत्रकार परिषदेत दिली माहिती..!

अमळनेर २०२४ च्या सार्वत्रिक विधानसभा आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन मी निवडणूक लढणारच अशी घोषणा केली आहे.
कुठल्याही राजकीयपक्षाचे तिकीट न घेता अपक्ष लढणार असुन अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
गेल्या काही दिवसांपासुन मतदार संघात अफवा पसरल्या जात होत्या की शिरीष चौधरी हे निवडणूक लढणार नाहीत मात्र या अफवांना कोणीही बडू बळी पडू नये असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना केले आहे. आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक हि अपक्ष लढणार आहे ,कारण गेल्या पाच वर्षात मी जनतेच्या संपर्कात आहे.जनतेच्या सुखदुखात सहभागी होत आहे.
त्यानुसार जनतेच्या आग्रहास्तव मी आगामी २०२४ ची विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असून केलेले विकास कामे आणि आगामी काळात होणारे विकास कामे यांच्यावर विश्वास ठेवून आणि जनता जनार्दनाने दिलेला कौल लक्षात घेता आगामी निवडणूक ही लढणारच असं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button