Amalner: रणसंग्राम 2024: दादा हाई काय बर न्हई… हाई सदिच्छा भेट आतेच काब..?आधी तुतारी मग माघारी…
अमळनेर सध्या अमळनेर मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. विविध उमेदवारांनी मोट बांधली असून इच्छुक उमेदवारांचे हळूहळू चित्र समोर येत आहे. गेल्या कित्येक दिवसात अज्ञातवासात गेलेले माजी आमदार साहेबराव पाटील अचानक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आले आहे. निवडणुकीतील एकंदरीत त्यांची नेमकी काय भूमिका असणार याची चांगलीच उत्सुकता नागरिकांमध्ये होती पण नेहमीप्रमाणे जिकडे फायदा तिकडे दादा ह्या त्यांच्या तत्वानुसार त्यांनी माघार घेतली असून अमळनेरच्या जनतेचा पुन्हा एकदा विश्वासघात केला आहे. साहेबराव पाटील तस पाहिलं तर अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक विषयाचा खोलवर अभ्यास करून ते काम करतात.पण नगरपरिषदेवर आम्ही आणि तालुक्यात तुम्ही अस जातीच राजकारण करून नेहमी फायद्या नुसार तळ्यात मळ्यात खेळ खेळला जात आहे. आधी राष्ट्रवादी मग नगरपरिषदेसाठी बायको भाजप मध्ये…! मग शहर विकास आघाडी की बिघाडी..? आधी शरद पवार यांच्या सोबत मग पुन्हा अजित पवारांसोबत..! झालेल्या भेटी या आताच अचानक का होत आहेत? यामागे काय डाळ शिजवली जाणार आहे? .हा राजकीय पातळीवरील ठरलेला आधीच नियोजित तर नाही? हे मनोमिलन कशा साठी?असे प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत आहेत.जनतेने आता निच्छित पणे हे समजून घ्यावं की सत्ते साठी काहीही करायला तयार असणारे लोक प्रतिनिधी हवेत की जनतेसाठी काम करणारे लोक प्रतिनिधी हवेत…






