Weather: येत्या 8 तासात राज्यात ह्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस.. या जिल्ह्यांना येलो अलर्ट…
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. पुण्यासह काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.आजही राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये हलक्या ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पुण्यासह काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोंकणातील जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, ठाणे, पुणे, अहमदनगर, धाराशिव, सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे.पुणे, कोकण, मुंबई या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस पुण्यामध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहील आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. इथे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33°C आणि 27°C च्या आसपास असेल.विदर्भातील नागपूरमध्ये पुढील काही दिवस ऊन पावसाचा खेळ पहायला मिळू शकतो. 14 जून रोजी कमाल तापमान 40 अंश तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहू शकतं. उत्तर महाराष्ट्रामध्येही हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.






