3.0 Update: अरे बापरे..राष्ट्रपती भवनात शपथविधीदरम्यान प्राणी..? बिबट्या की..?
राष्ट्रपती भवनात दिसलेला तो प्राणी कोणता? दिल्ली पोलिसांनी अखेर केलं स्पष्ट!
भाजपाचे खासदार दुर्गादास उईके आणि अजय टमटा शपथ घेत असताना हा प्राणी दिसला. इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल होताच नेटिझन्सने त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
राष्ट्रपती भवनात दिसलेला तो प्राणी कोणता ..?
पंतप्रधान नरेंद्र मदी यांचा ९ तारखेला मोठ्या उत्साहात शपथविधी झाला. त्यांच्याबरोबर ७१ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु, एकीकडे शपथविधी सुरू असताना राष्ट्रपती भवनात बिबट्या दिसला असल्याची चर्चा आहे. हा बिबट्या एका ठिकामाहून दुसऱ्या ठिकाणी जात असल्याचंही स्पष्ट दिसलं. दर्यान, या व्हिडओमादगची सतत्या आता पडताळण्यात आली असून तो नेमका कोणता प्राणी होता हे स्पष्ट झालं आहे.
दुर्गादास उइके मंत्रिपदाची शपथ घेत असताना मंचामागे असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या पायऱ्यांजवळून एक जंगली प्राणी चालत जात असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा जंगली प्राणी असून बिबट्या होता अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगली होती. परंतु, याबाबत ठोस माहिती देण्यात येत नव्हती. कारण हा प्राणी कॅमेऱ्यापासून खूप लांब असल्यामुळे स्पष्ट दिसत नव्हता. दरम्यान, तो प्राणी जंगली किंवा हिंस्र प्राणी नसून राष्ट्रपती भवनातील एक सामान्य मांजर होती.
याबाबत दिल्ली पोलिसांनी अधिकृत माहिती दिली. ते म्हणाले, काही मीडिया चॅनेल आणि सोशल मीडिया हँडल काल राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी समारंभाच्या थेट प्रक्षेपणादरम्यान कॅप्चर केलेली प्राणी प्रतिमा दाखवत आहेत आणि तो वन्य प्राणी असल्याचा दावा करत आहेत. या दाव्यात काही तथ्य नाही. कॅमेऱ्यात कैद झालेला प्राणी सामान्य घरातील मांजर आहे. कृपया अशा फालतू अफवांना बळी पडू नका असे आवाहन करण्यात आले आहे.







