Maharashtra

Weather Alert: 11/12 जून ह्या जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट..

Weather Alert: 11/12 जून ह्या जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट..

महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना 11 जून रोजी मान्सूनचा यलो अलर्ट दिला आहे. सोलापूर, लातूर, नांदेड, यवतामाळ, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. 12 जून रोजी महाष्ट्रात यलो अन् ऑरेंज अलर्ट दिला आहे.मान्सूनची वाटचाल कोकणानंतर आता उर्वरित महाराष्ट्राकडे सुरु आहे. मान्सूनने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भाग व्यापला आहे. तसेच मान्सूनला उर्वरित भागात प्रगती करण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यातील अनेक भागांत पाऊस सुरु आहे. धारधीव जिल्ह्यातील उगम पावणारी तेरणा नदी वाहू लागली आहे. यामुळे मदनसूरी बॅरेजचे दरवाजे उघडले आहे. लातूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्व नद्यां ना पूर आला आहे.अनेक ठिकाणी शेतीमध्ये पाणी घुसल्याने माती वाहून गेली आहे. ओढ्यांना पूर आल्याने शेत रस्ते ठप्प झाले आहेत.
नांदेड, बीड,जालना, परभणी, लातूर, धाराशिव, जळगाव या जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाडा आणि खान्देश लामोठा दिलासा मिळाला आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना ११ जून रोजी मान्सूनचा यलो अलर्ट दिला आहे. सोलापूर, लातूर, नांदेड, यवतामाळ, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. १२ जून रोजी महाष्ट्रात यलो अन् ऑरेंज अलर्ट दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button