Maharashtra

Health: तरुण पिढीत वाढतोय “लव्ह ब्रेन डिसऑर्डर’.. काय आहे हा आजार…

Health: तरुण पिढीत वाढतोय “लव्ह ब्रेन डिसऑर्डर’.. काय आहे हा आजार…

प्रेमात पडलेले तरुण-तरुणी रात्रंदिवस मोबाईलवर बोलतात. संभाषण संपले तरी मेसेज करत असतात. साधारण पणे प्रेमात हे नेहमीच चालते पण सतत बोलण्याची आणि मेसेज करण्याची ही सवय खरे तर एक आजार आहे. एक मुलगी तिच्या प्रियकराला दिवसातून 100 पेक्षा जास्त वेळा फोन करायची. प्रियकरावर ती इतकी अवलंबून होती की, तिला नेहमी प्रियकर तिच्याजवळ
हवा होता. प्रियकर कुठे आहे? तो काय करतो? तो कोणासोबत आहे? याबद्दल तिला सतत अपडेटस् हवे होते. काही दिवसांनी परिस्थिती अधिकच बिघडली. त्यामुळे दोघांनी डॉक्टरकडे जाणे योग्य मानले. डॉक्टरांच्या उपचारादरम्यान त्या मुलीला बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर असल्याचे निष्पन्न झाले. त्यालाच सामान्य भाषेत ‘लव्ह ब्रेन डिसऑर्डर’ असे म्हटले जाते.
‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ’च्या मते बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर ही एक प्रकारची मानसिक आरोग्य समस्या आहे. याला भावनिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तिमत्त्व विकार देखील म्हटले जाऊ शकते.जर एखाद्याला ही समस्या असेल, तर त्याला त्याच्या दैनंदिन कामांमध्ये, जबाबदाऱ्यांमध्ये आणि जीवनातील घटनांमध्ये समस्या येऊ शकतात. नोकरी आणि नातेसंबंध जपण्यात अडचण येऊ शकते.

बऱ्याच वेळा या समस्ये तून मुक्त होण्यासाठी लोक दारू किंवा अमली पदार्थ घेण्यास सुरुवात करतात. अशा लोकांची मन:स्थिती अस्थिर असते. एक प्रकारे ते स्वतःबद्दल बेफिकीर होतात. त्यांना केंव्हाही जास्त राग, अतिप्रेम, भीती इ वेगवेगळ्या मिक्स भावना येतात .रिकामेपणा जाणवतो. मनोचिकित्सक किंवा मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन या आजारावर उपचार केले जाऊ शकतात. या आजारामुळे चिंता आणि नैराश्य यांसारख्या मानसिक समस्या उद्भवू शकतात. बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डरवर किंवा लव्ह ब्रेन डिसऑर्डर हा मानसोपचारतज्ज्ञ यांच्या सल्ल्याने दूर होवू शकतो. हा आजार सुधारण्यास वेळ लागू शकतो. बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर असलेल्या लोकांसाठी आणि त्यांच्या प्रियजनांनी धीर धरून उपचार करणे आवश्यक आहे. या प्रकरणात डॉक्टरांचा सल्ला आणि औषधेच मदतीची भूमिका बजावू शकतात. शिवाय कुटुंबाचे सहकार्य आणि मदत देखील महत्वपूर्ण ठरते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button