Bollywood: कंगना राणावत प्रकरणात बॉलीवूड गप्प..? CISF च्या महिलेला बॉलिवूड मधून ऑफर..!
बॉलिवूड : सध्या सिने अभिनेत्री कंगना राणावत चर्चेत आहे. नुकतीच लोकसभा निवडणुकीत कंगना मंडी येथून निवडणूक जिंकून लोकसभेच्या खासदार पदावर विराजमान झाली आहे.कंगना राणावत हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले. मात्र, यावर बॉलिवूडच्या कोणत्याच कलाकाराने प्रतिक्रिया दिली नाही. आता नुकताच या CISF महिलेला मोठी ऑफर देण्यात आलीय.
कंगना राणावत हिच्यासोबत एक अत्यंत हैराण करणारा प्रकार घडलाय. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली.कंगना राणावत हिच्यासोबत चंदीगड विमानतळावर धक्कादायक घटना घडली. ज्याचे काही व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. या प्रकरणानंतर कंगना राणावत हिच्याकडून तक्रार देखील दाखल करण्यात आली.
चंदीगड विमानतळावर CISF च्या कर्मचारी महिलेने थेट कंगना राणावत हिच्या कानाखाली मारली. या महिलेचे नाव कुलविंदर कौर आहे. या घटनेनंतर कुलविंदर कौरला ताब्यात घेऊन तिला निलंबित देखील करण्यात आले. आता कुलविंदर कौर ही सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी कुलविंदर कौर नेमकी कोण? याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कंगना राणावत हिच्या कानाखाली मारण्यात आल्यानंतर बॉलिवूडच्या कलाकारांकडून काहीच भाष्य त्यावर केले आहे. आता डान्सर विशाल ददलानीने एक पोस्ट शेअर केलीये. विशाल ददलानीची पोस्ट पाहून विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. अनेकांना विशाल ददलानीची पोस्ट पाहून धक्काच बसलाय. विशाल ददलानीने थेट त्या सीआयएसएफ महिलेचे काैतुक केले आहे.
यासोबत विशाल ददलानीने कंगना राणावत हिच्यावर निशाणा साधला आहे. आता कंगना राणावत हिच्या कानाखाली मारणाऱ्या महिलेला विशाल ददलानी नोकरी देणार आहे. विशाल ददलानीने सोशल मीडियावर कंगना राणावत हिला कानाखाली मारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही पोस्ट आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
विशाल ददलानीने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मी कधीही हिंसेचे समर्थन करत नाही पण सीआयएसएफ जवान महिलेचा राग मी पूर्णपणे समजू शकतो. त्या महिलेवर कारवाई झाली तर मी तिला नोकरी देईन, जर तिला ते मान्य असेल तर. जय हिंद, जय जवान आणि जय किसान. असे विशाल ददलानी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. ही पोस्ट आता चर्चेचा विषय ठरलीये.






