Amalner

Amalner: सुखी होण्यासाठी दृष्टिकोण तपासा..– रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा

Amalner: सुखी होण्यासाठी दृष्टिकोण तपासा..– रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा

जीवन मृत्यूच्या दिशेने जात आहे असे वाटते का? जीवन स्वच्छ असावे प्रत्येक क्षणाचा वेळेचा सदुपयोग करा. वेळेचा संग्रह, सर्जन,संवर्धन करता येत नाही. सुखी होण्यासाठी दृष्टिकोण तपासा असे भावपूर्ण उद्‌गार प्रवचनकार- रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. यांनी काढले, ते अमळनेर येथील रलप्रवाह प्रवचनमालेत ७ ने पुष्प गुंफताना “दूर से ही प्रणाम” या विषयावर बोलत होते. या प्रसंगी प्रवचन प्रभाविका श्री संवेगनिधीश्रीजी म.सा.उपस्थित होत्या.

जीवन सुखी करण्यासाठी गुरुदेवांनी पुढील पांच गोष्टी करू नका हे सांगितले..

१)नो शो ऑफ
२) नो कट ऑफ ३)नो मुड ऑफ ४)नो बॅक ऑफ ५) नो स्वीच आँफ

१) नो शो ऑफ

केवळ दिखावा करू नका. आपल्या जीवनाचा सुर्यास्त केव्हाही होऊ शकतो. रुप, रुपये आणि रुबाब (अभिमान) यांचे प्रदर्शन करू नका. पुरुषाची ताकद त्याची संपत्ती आहे,स्त्रीची ताकद तिचे शरीर व सौंदर्य आहे, समाजात बुद्धीजीवी,बुद्धिवादी,बुद्धिशाली लोक असतात हे ओळखा.

२)नो कटऑफ-

कुटुंबाला एकत्र ठेवा मोठ्या घरात छोटा परिवार असेल तर घर असुरक्षित आहे परिवार मोठा असेल तर सुविधा कमी असतात परंतु सुरक्षा जास्त असते. लहान परिवार असेल तर घर मोठे बनवु नका सर्वासोबत रहा आनंदी रहा.

३)नो मुड ऑफ –

माझा मुड चांगला नाही हे सांगू नका. मुड ला ओवरटेक करण्याची तयारी नसेल तर प्रगती होणार नाही,यश मिळणार नाही.सत्यनिष्ठा व कर्तव्यनिष्ठा महत्त्वाची आहे. मनात सतत चांगले विचार आले पाहिजे. मूड शी संघर्ष करा,कर्तव्यापासून दूर राहू नका. पैसे कमविण्याचा मूड असतो दान देण्याचा मूड तयार करावा लागतो.

४) नो बैक ऑफ-

जीवन जगत असतांना कांही संकटे अडचणी आल्या तरी मैदान सोडू नका. सुख वेगळे आहे,सामुग्री वेगळी आहे.योग्य दृष्टिकोन हे सुख आहे. चूकीचा दृष्टिकोण हे दुःख आहे. नकारात दुःख आहे,स्वीकारण्यात सुख आहे.

५)नो स्वीच ऑफ-

जीवन सुंदर आहे संपवू नका. अपयशाला घाबरू नका, हिमंत सोडू नका.आत्महत्या करण्याचा विचार आपल्या मनात येऊ देऊ नका- परिश्रम घ्या,जिद्द सोडू नका. जीवन यशस्वी होईल. आनंदी व सुखी जीवन महत्त्वाचे आहे.त्यासाठी आपला दृष्टिकोण तपासा.

असे सविस्तर विवेचन लहान लहान गोष्टी व प्रसंगाच्या माध्यमातून प्रवचनकार रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी केले.
याप्रसंगी अमळनेर येथील मिड टाऊन हॉल मध्ये स्त्री-पुरुष भाविक प्रवचन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button