Exit Poll 2024 : 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोल अत्यंत महत्वाचा असून निकाला आधी पुन्हा एकदा अंदाज वर्तवला जात आहे.एक्झिट पोलच्या आकड्यावर निकालाच्या दिवशी साधारण काय चित्र असणार ते स्पष्ट होतं.
देशात लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याच मतदान सुरु आहे. आज सातवा शेवटचा टप्पा आहे. संध्याकाळी 6 वाजता मतदान संपल.एक्झिट पोलच्या आकड्यावर निकालाच्या दिवशी साधारण काय चित्र असणार ते स्पष्ट होतं. त्यामुळे मतदान संपातच जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलच्या आकड्यांकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.
साधारणपणे महायुती आणि महाविकास आघाडी यांना निम्मे निम्मे मतदारांचा कल दिसून येतो आहे. महायुतीला 24/25 जागा तर महाविकास आघाडीला 23 जागा अपेक्षित आहेत.यानुसार ठाकरे गटाला 10 जागा, शिंदे पवार गटाला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाला 7, काँग्रेसला 9 तर भाजपला 15 जागा तर अन्यका 3 जागेवर विजय मिळण्याची शक्यता आहे. हे चित्र सध्या तरी महाराष्ट्रात दिसून येत आहे. निकालाच्या दिवशी यात किती बदल होतो ते आपण पाहणारच आहोत.






