चांदवड नगरपरिषद कडून नाले साफसफाईस सुरुवात
उदय वायकोळे
चांदवड चांदवड शहरातील नाले साफसफाईबाबत अनेक समाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी निवेदने दिली होती,मात्र आता पावसाळ्याच्या तोंडावर नाले साफसफाईस नगरपरिषद कडून सुरुवात झालेली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या 10 दिवसांपासून चांदवड शहरात चोरांनी सुद्धा धुमाकूळ घातला आहे.नाल्यातील झुडपांचा फायदा घेऊन चोर तेथे लपून बसत असत व नाल्याकाठाची स्ट्रीट लाईट बंद असल्याने चोर फायदा घेऊन रात्री बाहेर निघत होते,अचानक झालेल्या 8 घरफोड्यांमुळे नागरिकही भयभीत झाले होते,मात्र आता तळ्वाडे रोड,गुजराथी नगर परिसरात नाले साफसफाई सुरु असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.






