Amalner

Amalner: गटशिक्षण अधिकाऱ्याची अर्वाच्य शिवीगाळ आणि 5% कमिशनची मागणी..

Amalner: गटशिक्षण अधिकाऱ्याची अर्वाच्य शिवीगाळ आणि 5% कमिशनची मागणी..

अमळनेर येथील शाळेची बदनामी करून कमिशन किंवा लाच मागून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांच्या विरूद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की लिपिक उमेश राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की ते जवखेडे सिम येथील श्री दत्त गुरु इग्लीश मेडीयम जवखेडे येथे सुमारे एक महीन्यापासुन लिपीक या पदावर कार्यरत आहे. 18/04/2024 रोजी 09. 44 वाजता रावसाहेब मांगो पाटील यांनी एका व्हाँट्सअ‍ॅप ग्रुपवर आमचे शाळेबददल बदनामी कारक मजकुर टाकला होता. याबाबत मी पंचायत समितीकडे 27/05/2024 रोजी अर्ज केलेला होता. त्याची नक्कल घेण्यासाठी 28/05/2024 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास मी तसेच रवींद्र सुकलाल पाटील, गोकुळ धोंडू पाटील असे पंचायत समिती अमळनेर येथे आवक जावक विभागात नकला घेण्यासाठी गेलो होतो. तेथुन जात असतांना आम्हाला रावसाहेब मांगो पाटील हे त्यांचे दालनात बसलेले आम्हांला दिसले. आवक जावक विभागातून काम आटोपुन गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांचे दालनात गेलो. तेथे त्यांना विनंती केली की, तुम्ही आमचे शाळेची बदनामी करु नका. तेव्हा रावसाहेब पाटील यांनी मोठ मोठ्याने शिव्या देत मारण्याची धमकी दिली. याशिवाय 2012 पासुन शाळेला मिळालेल्या शासकीय अनुदानावर 5% दराने पैसे आणुन देण्यास सांगितले. तसेच जर संध्याकाळ पर्यंत जर पैसे न आल्यास शाळेची मान्यता रद़द करण्याची धमकी दिली. व निरोप पोहचविण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी तेथून निघुन गेले होते. जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून खूप घाबरलो असे नमूद करण्यात आले आहे.यावरून गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांच्यावर कलम 384, 294 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button