Breaking:Loksabha Election: अरविंद केजरीवाल रिटर्न्स… लोकसभा निवडणुका आणि जामीन वर मुक्तता…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या गदारोळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना ०१ जून २०२४ पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा खूप मोठा निर्णय असून याचा प्रभाव निवडनूकांच्या निकालावर होणार आहे. केजरीवाल हे खूप मोठे विरोधक मोदी सरकारचे आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर हा आदेश दिला. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. 1 जूनपर्यंत केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. आज संध्याकाळपर्यंत केजरीवाल बाहेर येण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या सुटकेने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्चला अटक केली होती. मागील 50 दिवसांपासून ते तुरुंगात आहेत. सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल यांना हा अंतरिम जामीन सुप्रिम कोर्टाने मंजूर केला आहे.केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मंगळवारी दिले, जेणेकरून ते निवडणुकीचा प्रचार करू शकतील. अंतरिम जामीन मंजूर झाल्यास केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून कोणतेही शासकीय कर्तव्य पार पाडू दिले जाणार नाही. केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी आधी याला विरोध केला, पण नंतर ते मान्य केले.१ जूनपर्यंत अंतरिम जामीन म्हणजे २५ मे रोजी दिल्लीत मतदान होईल, तेव्हा केजरीवाल तुरुंगातून बाहेर येतील. त्यानंतर २ जून २०२४ रोजी केजरीवाल यांना पुन्हा तुरुंगात जावे लागेल. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी म्हणजेच ४ जून २०२४ रोजी केजरीवाल तुरुंगात असतील.
ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निच्छित पणे लोकसभा निवडणुकीच्या निर्णयावर होणार आहे. मोदींची हवा टाईट होवू शकते. भाजप सरकार ला मोठी तयारी करावी लागणार आहे. आता येत्या 3 आठवड्यात काय घटना घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






