Optical Illusion : झाड तर दिसतेय पण लपलेला ‘पोपट’ शोधून दाखवा
तुम्ही या चित्रामध्ये एक खोली पाहू शकता. या खोलीमध्ये एक झाड आहे. एक टेबल आहे. आणि त्या टेबलावर विविध प्रकारच्या वस्तू आहेत. पण या सर्व वस्तूंमध्ये एक पोपट लपला आहे. जर तुम्ही हुशार असाल तर तो लपलेला पोपट ओळखून दाखवा. आतापर्यंत हजारो लोकांनी हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न केलाय. पण ९९ टक्के लोक हे कोडं सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. पाहूया तुम्हाला या चित्रामध्ये लपलेला पोपट शोधता येतो का?
हे कोडं सोडवण्यासाठी तुम्हाला या चित्राचं नीट बारकाईनं निरिक्षण करावं लागेल. कारण अशा प्रकारच्या कोड्यांना डिटेक्टिव्ह पझल असं म्हणतात. उत्तर तुमच्या डोळ्यांसमोरच असतं. फक्त तुम्हाला ते योग्य प्रकारे शोधावं लागतं. चला तर मग शोधूया तो लपलेला पोपट.
बराच वेळ विचार करून सुद्धा तुम्हाला उत्तर सापडत नाहिये का? तर मग निराश होऊ नका. खाली दिलेलं चित्र पाहा त्यामध्ये योग्य उत्तर दिलेलं आहे
झाड आणि टेबल यांच्यामध्ये निर्माण झालेली आकृती पाहा. त्यामध्ये तुम्हाला हा लपलेला पोपट सापडेल. हेच या कोड्याचं उत्तर आहे. बरं, आता तुम्हाला योग्य उत्तर समजलं आहेत. तर आता हे चित्र तुम्ही आपल्या मित्र-मंडळींना सुद्धा पाठवा आणि पाहा त्यांना हा पोपट शोधता येतो का? आणि त्यांनी दिलेली गंमतीशीर उत्तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. (Source: Pinterest)






