Space Wonder: अंतराळात अंतराळवीराचा मृत्यु झाला तर मृतदेहाचे काय होते..?
मानवाला सुरुवातीपासूनच अंतराळाचे आकर्षण राहिले आहे. अंतराळाच्या उदरात काय दडले आहे याचा शोध घेण्यासाठी गत ६० वर्षांपासून मानवी अंतराळ मोहिमा राबविल्या जात आहेत. आता तर अंतराळात मानवी वस्तीच्या दिशेनेही प्रगती सुरू आहे. पण जर अंतराळात एखाद्या अंतराळवीराचा मृत्यू झाला तर काय ? हा सवाल कायम आहे. सध्यातरी अंतराळात मृतदेह जतन करून पृथ्वीवर आणणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. आतापर्यंतच्या अंतराळ मोहिमांमध्ये एकूण २० जणांचा मृत्यू झाला. येत्या काळात मानवी मोहिमांचे प्रमाण वाढणार असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढण्याची भीती आहे.मानवाला अवकाशात पाठवणं हे अवघड काम आहे, तसंच धोकादायकही आहे.गेल्या 60 वर्षांत अशा घटनांमध्ये सुमारे 20 जणांचा मृत्यू झाला आहे.1986 ते 2003 दरम्यान नासाच्या स्पेस शटल अपघातांमध्ये 14 लोकांचा मृत्यू झाला.1967मध्ये अपोलो-1 लाँचपॅडच्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. 1971च्या सुएझ 11 मिशनमध्ये आणखी तिघांचा मृत्यू झाला होता.अंतराळ प्रवास कठीण आणि महाग आहे.आता सशुल्क व्यावसायिक अवकाश प्रवासही सुरू झाला आहे. अंतराळ प्रवास आता सामान्य होत आहे.
अनेकांच्या मनात निर्माण होणारे प्रश्न म्हणजे – अवकाशात गेल्यावर मृत्यू झाला तर अंतराळवीरांच्या मृतदेहाचं काय होतं? तेथे अंत्यसंस्कार होतात का?
त्यांना परत कसं आणतात? एक महागडी, दीर्घ नियोजित सहल मध्येच संपवतात का?
भविष्यात लाखो किलोमीटर दूर असलेल्या चंद्रावर किंवा मंगळावर अमेरिकन अंतराळवीरांचा मृत्यू झाला तर? नासा काय करेल?
या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
‘नासा’चे प्रोटोकॉल काय सांगतात?
अंतराळ प्रवासाला जाणारे अंतराळवीर आवश्यक तितके निरोगी आहेत याची खात्री नासाची ‘द ट्रान्सलेशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर स्पेस हेल्थ’ करुन घेतं.
“जर एखाद्या अंतराळवीराचा अवकाशात मध्येच किंवा ‘पृथ्वीच्या खालच्या कक्षेत’ ( ‘low Earth orbit’) मृत्यू झाला, तर काही तासांतच त्यांचं शरीर कॅप्सूलमध्ये पृथ्वीवर आणलं जाऊ शकतं”, असं संस्थेत काम करणारे प्रोफेसर इमॅन्युएल उर्क्विएटा म्हणतात.
चंद्रावर जर एखाद्याचा मृत्यू झाला तर वेळेत मृतदेह पृथ्वीवर पोहोचणं कठीण होतं. त्यासाठी काही दिवस लागतील. नासानं अशा गोष्टींसाठी एक तपशीलवार प्रोटोकॉल देखील विकसित केला आहे.
जर एखाद्या मोहिमेवर कोणी मरण पावलं आणि त्याचवेळी अंतराळवीर पृथ्वीवर परत येत असतील तर, मृतदेह घाईघाईनं आणत नाहीत. बाकीचे अंतराळवीर सुरक्षित परत येणं हे संस्थेचे पहिलं प्राधान्य आहे.
मानवी अंतराळ मोहिमांदरम्यान जर एखाद्या अंतराळवीराचा मृत्यू पृथ्वीच्या खालच्या कक्षेत झाल्यास त्याचा मृतदेह काही तासांमध्ये पृथ्वीवर आणला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर मृत्यू झाल्यास चालक दल काही तासांमध्ये एका कॅप्सूलमध्ये मृतदेह ठेवून ते पृथ्वीवर परत आणू शकतील. पण हीच गोष्ट चंद्रावर झाली तर चालक दलाला मृतदेह पृथ्वीवर आणण्यासाठी काही दिवस लागू शकतील.
अंतराळातच दफनविधी?
जर एखाद्या अंतराळवीराचा मंगळ ग्रहावर मृत्यू झाला तर त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करणे कठीण आहे. यासाठी खूप जास्त ऊर्जा लागेल. पण जिवंत सदस्यांना इतर कामासाठी ऊर्जा आवश्यक असल्याने या पर्यायांचा विचार करता येणार नाही. तर दफनविधीदेखील अवघड आहे. कारण मृतदेहाचे विघटन झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या जीवाणू व अन्य जीवांमुळे ग्रहाचे वातावरण दूषित होण्याची भीती आहे. त्यामुळे शक्यतो मृतदेह पृथ्वीवर परत आणेपर्यंत एक विशेष बॉडी पिशवी ठेवली जाईल.
मृतदेह परत घेऊन पृथ्वीवर येऊ शकतो
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाकडे अशा स्थितीचा सामना करण्यासाठी विस्तृत प्रोटोकॉल आहे. मात्र, मंगळ ग्रहाच्या ३० कोटी मैलांच्या प्रवासात जर एखाद्या अंतराळवीराचा मृत्यू झाला तर स्थिती एकदम वेगळी राहील. अशा स्थितीत इतर चालक दलाला एकदम मागे फिरता येणार नाही. तर मोहीम संपल्यानंतर चालक दल मृतदेह परत घेऊन पृथ्वीवर येऊ शकतो.यादरम्यान मृतदेहाला एका वेगळ्या कक्षात किंवा विशेष मृतदेह पिशवीत ठेवले जाईल. अंतराळ यानातील स्थिर तापमान आणि आर्द्र वातावरणामुळे मृतदेहाचे संरक्षण करण्यास मदत मिळेल. पण ज्यावेळी एखाद्या अंतराळवीराचा मृत्यू अंतराळ स्थानक किंवा अंतराळ यानात झाला असेल, त्याचवेळी ही बाब शक्य आहे.
स्पेससूट नसल्यास मृत्यू अटळ !
अन्य ग्रहावर मानवी वस्तीचे स्वप्न रंगारूपाला येत असले तरीही अंतराळात स्पेससुटशिवाय जगण्याची कल्पना सध्या तरी दुरापास्त आहे. पण जर एखाद्या अंतराळवीराने स्पेससुटच्या सुरक्षेविना अंतराळात पाऊल ठेवले तर त्याचा लागलीच मृत्यू होईल. चंद्रावर जवळपास कोणत्याही प्रकारचे वातावरण नाही. तर मंगळ ग्रहावरील वातावरणदेखील विरळ असून त्या ठिकाणी ऑक्सिजनचे अस्तित्व नाही.
मंगळावर मृत्यू झाला तर तिथे अंत्यसंस्कार होणार का?
अंतराळवीर खूप दूर जात असताना एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्यांना परत आणणं कठीण आहे. मोहिमेच्या शेवटी मृतदेह पृथ्वीवर परत आणण्यासाठी काही वर्षे लागू शकतात.तोपर्यंत मृतदेह एका खास चेंबरमध्ये किंवा खास बॉडी बॅगमध्ये ठेवण्याची जबाबदारी अंतराळवीरांची असते.अंतराळयानामध्ये स्थिर तापमान आणि आर्द्रता शरीराचं संरक्षण करण्यास मदत करते.
स्टेशन किंवा स्पेसक्राफ्टसारख्या ठिकाणी हे शक्य आहे. पण मंगळासारख्या ग्रहावर कसं करायचं? कारण तेथील हवामान वेगळं आहे.
समजा, अंतराळवीर मंगळावर पोहोचल्यावर कोणी मरण पावलं. त्यांना अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्यामुळे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांसाठी काम अवघड होतं.कारण त्यासाठी त्यांना खूप ऊर्जा खर्च करावी लागते. त्यावेळी त्यांना मिशनचं काम करण्यासाठी फार ऊर्जा लागते. दुसरीकडे दफन करणे ही चांगली कल्पना नाही.शरीरातील जीवाणू आणि इतर जीव मंगळाच्या पृष्ठभागाला दूषित करू शकतात. त्यामुळे मृतदेह जमिनीवर येईपर्यंत एका खास बॉडी बॅगमध्ये ठेवला जाईल.






