Amalner

Amalner: जय भोलेच्या गजरात कपिलेश्वर ते अमळनेर पायी कावड यात्रा संपन्न…

Amalner: जय भोलेच्या गजरात कपिलेश्वर ते अमळनेर पायी कावड यात्रा संपन्न…

अमळनेर श्रावण सोमवार निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिर लक्ष्मीनगर संस्थानतर्फे यंदा पहिल्यांदा कपिलेश्वर ते अमळनेर पायी कावड यात्रा काढण्यात आली. यास भाविकांचा प्रतिसाद मिळाला. यंदा पहिल्या वर्षी २५ शिवभक्त कावड यात्रेत सहभागी झाले. प्रारंभी सर्व शिवभक्तांनी कपिलेश्वर महादेव मंदिर येथे तापी नदीवर जाऊन विधिवत पूजा करून कावडीत तापी मातेचे पवित्र जल भरून कावड यात्रेत सुरुवात झाली. नीम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल चौधरी यांनी शिवभक्तांचे स्वागत केले. श्री क्षेत्र ओंकारेश्वर मंदिर परिसरात आल्यानंतर महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला. शांतीलाल पाटील, दिलीप पाटील, धनराज चौधरी, घनश्याम पाटील, रवींद्र मुसळे, चंद्रकांत पाटकरी, सखाराम पाटील, गुलाबराव पाटील, वाय एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कावड यात्रा काढण्यात आली. यात्रेत विशाल सोनार, जयेश अहिरराव, जयेश कासार, निखिल जळोदकर, चेतन कासार, रोहित चौधरी, अलका चौधरी, नलिनी बाविस्कर, आशाबाई पाटील, सीमा पाटील, नंदिनी राजपूत, सागर कुलथे, राहुल चौधरी, रेखाबाई जळोदकर, प्रथमेश पाटील, पियुष पवार, शिवाजी लोहार आदी सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button