Amalner

Amalner: “टरबूज” टार्गेट.. मराठा बांधवांवर झालेल्या अमानुष लाठी चार्जचा जाहीर निषेध..

Amalner: “टरबूज” टार्गेट.. मराठा बांधवांवर झालेल्या अमानुष लाठी चार्जचा जाहीर निषेध..

अमळनेर जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठी चार्जचा निषेध म्हणून,सखल मराठा समाजातर्फे मा. प्रांत खेडकर साहेब ता.अमळनेर जिल्हा जळगाव यांना निवेदन देण्यात आले. जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली.ही ची घटना अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय संताप जनक असून मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही तर हा समाज हिताच्या विषय आहे. हा लाठीचार्ज नाही तर आंदोलन कर्त्यांवर शासन प्रणित हल्ला आहे. माता-भगिनींवर हात उचलणाऱ्या सरकारचा व पोलिसाचा धिक्कार असो.मानव हिताला न शोभणारी घटना जालन्यात घडली आहे. त्या घटनेच्या निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर टरबुज फोडून सदर घटनेच्या तीव्र निषेध नोंदवीत आहोत. सदर आंदोलनात महिला मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांना देखील पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. महिला व पुरुष जखमी झाले. सदरची घटना ही खूप निंदनीय आहे, महाराष्ट्र हे एक पुरोगामी विचारधारेचे व महिलांचा आदर करणारे राज्य आहे. परंतु सद्याचे असंवेदनशील, निगरगठ्ठ सरकार आहे. सदर पोलीस प्रशासनाने केलेल्या अमानुष लाठी चार्जची चौकशी होऊन संबंधितावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही व्हावी असे न झाल्यास सखल मराठा समाज रस्त्यावर उतरेल व त्यांच्या होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असे निवेदन देण्यात आले, या वेळी मराठा बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button