Amalner: तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा… मांडळ येथील शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी…
अमळनेर तालुक्यात गेल्या महिनाभर पाऊस न पडल्याने पिकांना नुकसान पोहचले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न हातचे गेले आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मांडळ येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात अमळनेर तालुक्यात पाऊस न पडल्यामुळे अनेक गावातील नागरिकांना पिण्याच्यामपाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मांडळ, मूडी वावडे परिसरातील शेतकऱ्यांची कोरडवाहू पिके सुकली आहेत. ज्वारी, बाजरी, उडीद, मुंग कपाशी इत्यादी पिके शेतकऱ्याच्या हातातून गेली असून पूर्णपणे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतात शेतकऱ्यांनी लाखो रुपये टाकले असून पाणी नसल्याने पूर्णपणे खर्च वाया गेला आहे. शासन स्तरावरून तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी पाहणी दौरा करू दुष्काळग्रस्त स्थिती असल्याचा अहवाल शासन स्तरावर पाठवावा व शासनाने शेतकऱ्यांना पिक विम्याची चाळीस टक्के रक्कम जाहीर करून त्वरित अदा करण्यात यावी तसेच यावर्षीची विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करून शेतकऱ्यांचे या वर्षाचे पीक कर्जही माफ करण्याची मागणी केली आहे. तसेच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने. भविष्यात जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल म्हणून शासनाने तात्काळ पर्यायी व्यवस्था
करावी, अशी मांडळ येथील विजय नथू पाटील, राजेंद्र अण्णा धनगर, संतोष पुंडलिक पाटील,, रावसाहेब पंडित कोळी, सुरेश लोटन कोळी, निलेश भास्कर पाटील, भुरा काशिनाथ बडगुजर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. या निवेदना द्वारे तहसीलदार, प्रांत अधिकारी, कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.






