Amalner

Amalner: नगरपरिषदेत सावकारी धंदा सुरू.. नळपट्टी करावर 2% नुसार व्याज आकारण्या विरोधात निवेदन…

Amalner: नगरपरिषदेत सावकारी धंदा सुरू.. नळपट्टी करावर 2% नुसार व्याज आकारण्या विरोधात निवेदन…

अमळनेर:- अमळनेर शहरातील नागरिकांना नगरपरिषदे मार्फंत नळपट्टी वसुली करीता देणायां नळपट्टी बील मधील रकमेस द.म. द. शे.व्याज(२%) प्रमाणे लावण्याचा तुगलगी निर्णय घेत बील नागरिकांना दिले जात आहे. कायद्याचा धाक दाखवत सदर व्याज वसूलीचे धोरण म्हणजे अमळनेर करांची आपण एक प्रकारे लूट करीत आहात अशी भावना जनमानसाची झाली आहे. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांचा मालमत्ता धारकांना लोकवर्गणीच्या नावाखाली वारंवार वसुलीचा घाट घातला जात आहे. (बांधकाम परवानगीच्या वेळेस लोकवर्गणी, नळ कनेक्शन घेतांना लोकवर्गणी, मालमत्ता वार्पीक कर मध्ये लोकवर्गणी ) म्हणजे एकच व्यक्तीकडून किती वेळेस लोकवर्गणी घ्यावी याला देखील मर्यादा आहेत की नाही? त्याचप्रमाणे खुल्या भुख्ंडाना देखील कर नगरपरिषदेने निश्चीत केला आहे. आपण आम्हा नागरिकांना सुख सोयी देण्यापेक्षा अव्वाचा सब्वा छुप्या करांचा माध्यमातुन एक प्रकार लूटच करीत आहात वरील तूघलगी निर्णय /सावकारी वसुली निर्णय तात्काळ नागरीहितास्तव मागे न घतल्यास जन आंदोलनाची भुमिका आम्हांस स्विकारावी लागेल. पुनश्च लोकहितास्तव तात्काळ निर्णय घ्यावा अश्या विनंती चे निवेदन आज आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी तर्फे मा. मुख्याधिकारी यांना आज दि 09/08/2023 रोजी निवेदन दिले. निवेदनावर गटनेते प्रवीण पाठक, योगराज संदानशीव, पंकज चौधरी, नाविद शेख, अनिल महाजन, गुलाब नबी पठाण, जाकीर पठाण, सुनिल भामरे, प्रवीण पाटील, पांडुरंग महाजन, श्रीराम चौधरी यांच्या स्वाक्षरी आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button