Amalner: संतापजनक… सख्ख्या बापानेच केला मुलीवर सतत बलात्कार…! तिने कुठे जावे…? ती कुठे सुरक्षित आहे..?
अमळनेर : एकीकडे मणिपूर मधील महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असताना संपूर्ण देशात संताप खदखदत असताना अमळनेर शहरात अशीच अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याने अत्याचार केल्याची संतापजनक घटना शहरातील एका भागात घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसात नराधम पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सतत दिड वर्षांपासून बालिकेवर अत्याचार
याबद्दल सविस्तर माहिती अशी की 14 वर्षीय पीडिता आपल्या आई वडील यांच्या सोबत अमळनेर येथील एका परीसरात राहते. पण तिच्या आई वडिलांमध्ये सुमारे दिड वर्षापासून भांडण होत होते. भांडण झाल्यावर आई बाहेरगावी निघून जात असे त्यामुळे वडिलांसोबत घरीच राहून पीडीता शाळेत जात असे परंतू नराधम पिता रात्री घरी आल्यावर लैंगिक शोषण करत असे. पीडीतेने विरोध केल्यावर तुला आणि तुझ्या आईला मारेन, अशी धमकी देत असे.. वेळोवेळी आई बाहेरगावी गेल्यावर रात्रीच्या वेळेस नेहमीच नराधम पित्याने संबंध ठेवले. भीतीने या प्रकाराबाबात पीडीतेने कुणालाही सांगितले नाही. 21 एप्रिल पासून वडिलांसोबत भांडण झाल्यापासून पीडीतेची आई बाहेरगावी निघून गेली होती. 15 तारखेला वडिलांनी केलेला
अत्याचारनंतर दीड वर्षापासून सुरू असलेला छळ असह्य झाला. आणि दि 18 रोजी आई आणि आजी घरी परत आल्यावर दुसऱ्या दिवशी रात्री आई व आजी ला या घटनेबाबत पिडीतेने सविस्तर सांगीतले. त्यानंतर दि 20 रोजी पीडीतेने आईसोबत पोलीस स्टेशन गाठले आणि सदर नराधम बापाविरुद्ध गुन्हा पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तपास स नि हरीदास बोचरे करीत आहेत.






