Amalner: सेंट मेरी शाळेत पार पडली शालेय मंत्रिमंडळ निवडणूक…
अमळनेर येथील सेंट मेरी शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक नुकतीच पार पडली. मुलांनी अभिरूप मतदान प्रक्रियेत भाग घेवून विद्यार्थ्यांनी मतदान केले. यातून त्यांना
लोकशाही पद्धतीचा अनुभव आला.
शालेय जीवनात मुलांना मतदान प्रक्रिया समजावी या साठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे: हर्षवर्धन खंडागळे – अध्यक्ष, हर्षवर्धन पाटील विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयसी सोये – विद्यार्थिनी प्रतिनिधी, प्रतिक पाटील – स्पोर्ट्स कॅप्टन, खुश जैन – सांस्कृतिक चिटणीस, यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जोईस, उपमुख्याध्यापिका सिस्टर सिन्सि, बेबी लॅन्ड को ओर्डीनेटर सिस्टर राफेल यांनी अभिनंदन केले. निवडणूक प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.






