आदिवासी मुलांचे वसतीगृह चांदवड येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा स्मृतिदिन निमित्त अभिवादन
उदय वायकोळे चांदवड
आज शुक्रवार , दिनांक – ०९ जून २०२३ येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा स्मृतिदिन निमित्त भाजपा आदिवासी मोर्चा व चांदवड शहर भाजपा चे वतीने प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी चांदवड चे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल व जिल्हा भाजपा नेते मोहन शर्मा यांनी वसतिगृहाची पाहणी केली. आदिवासी मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय पाडवी यांनी विद्यार्थ्यांच्या विविध समस्या मांडल्या. बारावी चा नुकताच निकाल लागल्यामुळे नविन विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या आत वसतिगृहाच्या सर्व सुविधा पूर्ववत व्हाव्यात अशी सूचना भूषण कासलीवाल यांनी केली. व शासनस्तरावर कोणतीही मदत लागली तर सहकार्य करू असे आश्वासन दिले.
यावेळी वसतिगृहाचे अधिक्षक अमोल निकम व विद्यार्थ्यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. अभिवादन करण्यासाठी अनेक पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रामुख्याने पुढील मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल , ज्येष्ठ भाजपा नेते मोहन शर्मा , आदिवासी मोर्चा तालुकाध्यक्ष संजय पाडवी , महेश बो-हाडे , महेश खंदारे , किशोर क्षत्रिय , विशाल ललवाणी , पत्रकार नितीन फंगाळ , पत्रकार उदय वायकोळे , इ. पदाधिकारी उपस्थित होते व उमेश बोरसे , किरण पाडवी , निलेश चौरे , राजु बागुल , सुनिल किशोरे , नरेंद्र ठाकरे , वैभव ठाकरे इ. विद्यार्थी उपस्थित होते.