Amalner: पर्यावरण दिनानिमित्त व वड सावित्री पौर्णिमे निमित्त वडाची रोपे लावून गोपाळ बडगुजर यांनी सपत्नीक दिला पर्यावरण बचाव चा संदेश…
अमळनेर वट सावित्री पौर्णिमेला महिलांची वड पूजनसाठी गैरसोय होऊ नये म्हणून, गलवाडे बुद्रुक येथील गोपाळ पंडित बडगुजर यांनी पर्यावरण दिनानिमित्त पाच जून रोजी पाच वडाची रोपे घेऊन आपल्या गाव परिसरात लावले आहेत.
महिला दरवर्षी वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करतात. मात्र वडाचे झाड शोधण्यासाठी पूजेचे थाट घेऊन महिलांना इतरत्र भटकावे लागते. यापुढे गावातील महिलांना हा त्रास होऊ नये यासाठी गलवाडे बुद्रुक येथील गोपाळ पंडित बडगुजर यांनी पाच जून रोजी पाच वडाची रोपे घेऊन आपल्या गाव परिसरात लावले आहेत. यासाठी त्यांच्या पत्नी शुभांगी बडगुजर यांनी प्रेरणा दिली. वडाच्या झाडाचे महत्व अगदी पुराणात सांगितले आहे, सर्वाधिक प्राणवायू देणारे झाड म्हणजे वड होय. वडाची सावली देखील दाट पडते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात येणारा वट सावित्री पौर्णिमा साजरा करण्यासाठी वडाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे च महत्व
ओळखून बडगुजर दाम्पत्याने येत्या पावसाळ्यात देखील वडाची आणखी रोपे लावण्याचा मानस व्यक्त केला आहे.






