Amalner: महिला व बालविकास विभाग आणि ग्रामपंचायत मुडी बोदर्डे तर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार 2023 चे वितरण..
अमळनेर महाराष्ट्र शासन महिला बालकल्याण विभाग आणि ग्रामपंचायत कार्यालय मुडी बोदरडे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार 2022 23 करिता ग्रामीण भागात महिला व बालकल्याण क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान व्हावा या उदात्त हेतूने शासनातर्फे हा गौरव सोहळा साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मुडी बोदरडे ग्रामपंचायतचे सरपंच श्री प्रवीण संधानशिव तसेच ग्रामसेवक श्री राहुल पाटील तसेच निवृत्त कृषी सहाय्यक बीटी बोरसे साहेब त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते कैलास नजान तसेच केंद्रीय नवोदय विद्यालय समिती सदस्य तुषार भाऊ सैंदाणे आणि अविनाश पाटील शितल पाटील सौ सुनंदा चव्हाण आशाबाई भिल नितीन पाटील लहू चव्हाण अंगणवाडी सेविका श्रीमती अलकाबाई सैंदाणे तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला महिलांचे आरोग्य आणि बाल विकास या क्षेत्रात गेल्या 14 वर्षापासून अविरत कार्य करणाऱ्या सौ सुनीता तुषार सैंदाणे यांना यावर्षीचा महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभाग पुरस्कृत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार 2023 करिता सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला गोरगरीब वंचितांसाठी शासनाच्या महत्त्वकांक्षी विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्या कामी तसेच प्रसूती सेवा सुखरूप होणे या आगळ वेगळ कार्यातील स्थान लक्षात घेता आदिवासी समाजासाठी समाजप्रबोधनातून आरोग्यसेवा आदिवासी वस्तीवर पोहोचवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या 14 वर्षापासून अविरत कार्य करीत आहेत आज पर्यंत त्यांना शासनाने विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे त्याचप्रमाणे बोदरडे चोंदी या आदिवासी वस्तीतील बालकांना शिक्षणाची गोडी लागावी त्यांचा आर्थिक व शैक्षणिक थर उंच व्हावा या उदात्त हेतूने निर्लसपणे कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनीस श्रीमती विजया विश्वास महाले यांना अहिल्याबाई होळकर सामाजिक गौरव पुरस्कार 2023 सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक स्तर आणि बचतीचे महत्त्व या विषयावर बचत गट स्थापन करून त्यांना विविध व्यवसाय आणि प्रशिक्षण मिळवून देणे कामी योगदान देणाऱ्या श्रीमती कविता बोरसे यांना पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला स्वर्गवासी सिंधुबाई सपकाळ तसेच मदर तेरेसा डॉक्टर बाबासाहेब आमटे यांच्या विचारांवर प्रभावित होऊन हा माईंचा सामाजिक सेवेचा वसा पुढे तसाच कार्यरत ठेवत आम्ही पुढे नेणार असल्याचे याप्रसंगी त्यांनी नमूद केले प्रजेच्या सुखामध्ये राजाचे सुख असते आणि त्यांच्या हितामध्येच राजाचेही हित सांभाळले असते अशा प्रशासनाच्या मुख्य आधार असलेल्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मनगटीतील बळ बुद्धी आणि चातुर्य त्याचेच खरे कर्तुत्व आणि तोच खरा स्व कर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांचा कृतीशील कार्याचा उल्लेख सोनेरी अक्षरांनी केला जातो अशा लोकमाता अहिल्यादेवी होळकर या सर्व धर्म समभाव अस्पृश्यता उच्चाटन सामाजिक एकात्मता स्त्री पुरुष समानता गोरगरिबांविषयी कडकडा हुंडा पद्धतीचे उच्चाटन अनिष्ट पद्धतींचे चालीरीती आणि त्यांच्या अनिष्ट रूढी परंपरा यावर श्री तुषार भाऊ सैंदाणे यांनी आपल्या प्रास्ताविकात त्यांचा कार्याचा गौरव केला या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत बोदर्डे यांच्या वतीने श्री सुनील कोळी लहू चव्हाण तसेच नानाभाऊ चव्हाण पप्पू भाऊ मतकर राजू दादा मतकर अजय देडगे मनोज देडगे यांनी केले होते सर्व सन्मान पुरस्कार प्राप्त महिला भगिनी यांच्या पुढील समाज उपयोगी कार्यास सर्वांनी शुभेच्छा प्रदान केल्या






