Amalner

Amalner: पेटत्या ओमनीचा थरार …!

Amalner: पेटत्या ओमनीचा थरार …!

अमळनेर एलपीजी गॅसवर चालणाऱ्या ओमीनीला अचानक आग लागून दोन वाहने जळून खाक झाली तर दोन घरांचे काही साहित्य जळाल्याची घटना शारदा कॉलनीत १७ रोजी सकाळी १० वाजता घडली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, अमळनेर शहरातील शारदा कॉलनीतील वड चौकातील बाबू गॅरेजवळ गोपाल दिनकर सोनार हा त्याची ओमीनी क्रमांक एम एच १८, बी सी १२८९ हिच्यावर पत्नीला घेऊन किराणा करण्यासाठी जात असताना गाडी सुरू करताच स्टेअरिंग जवळ अचानक आग लागून गाडीने पेट घेतला. काही मिनिटात आगीने रौद्र रूप धारण केले. प्रताप शिंपी यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे नितीन खैरनार, दिनेश बिहाडे, जफर खान, फारुख शेख, भिका संदानशीव, वसीम खान यांनी बराच वेळ प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. तोपर्यंत ओमीनी आणि रिक्षा अशी दोन्ही वाहने संपूर्ण जळून खाक झाली होती. आजूबाजूच्या घरांना ही आग लागली त्यात काही साहित्य जळाले. सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button